नाही. रेकी फक्त शरीरासाठीच नाही, तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही तितकीच प्रभावी आहे. ती तणाव, भीती आणि नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करते.
रेकी शिकण्यासाठी मला धार्मिक असण्याची गरज आहे का?
मुळीच नाही. रेकी हा कोणताही धर्म नाही. ही एक नैसर्गिक ऊर्जा पद्धती आहे. कोणत्याही धर्माचा किंवा देवावर विश्वास असणारा (किंवा नसणारा) व्यक्ती रेकी शिकू शकतो आणि तिचा लाभ घेऊ शकतो.
मी रेकीने इतरांना बरे करू शकतो/शकते का?
हो, नक्कीच! एकदा तुम्ही रेकीचा 'लेव्हल १' चा कोर्स पूर्ण केला की, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना, झाडांना किंवा पाळीव प्राण्यांनाही रेकी देऊ शकता.
रेकी शिकण्यासाठी काही विशेष पात्रता लागते का?
नाही. रेकी शिकण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कोणतीही अट नाही. फक्त तुमची शिकण्याची इच्छा आणि थोडा सराव करण्याची तयारी असायला हवी.
रेकीचे काही दुष्परिणाम (Side Effects) असतात का?
नाही, रेकीचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार पद्धती आहे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही; उलट, तुम्हाला अधिक शांत आणि उत्साही वाटते.
मी लांब असलेल्या व्यक्तीला (Distance Healing) बरे करू शकतो का?
हो, नक्कीच! पण हे तुम्ही रेकीच्या अॅडव्हान्स लेव्हल (Level 2) मध्ये शिकता. यामध्ये चिन्हांचा (Symbols) वापर करून तुम्ही जगात कुठेही असलेल्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला सकारात्मक ऊर्जा पाठवू शकता.
मी खूप वर्षांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी रेकी शिकलो होतो, मी पुन्हा तुमच्याकडे शिकू शकतो का?
हो, तुमचे स्वागत आहे! जर तुमचा सराव सुटला असेल किंवा तुम्हाला पुन्हा उजळणी (Refresh) करायची असेल, तर तुम्ही नक्कीच पुन्हा जॉईन होऊ शकता. यामुळे तुमची ऊर्जा वाहिनी अधिक प्रबळ होण्यास मदत होईल.
गरोदर स्त्रिया किंवा लहान मुले रेकी घेऊ शकतात का?
हो, रेकी सर्वांसाठी सुरक्षित आहे. गरोदरपणात यामुळे मनःशांती मिळते आणि बाळाच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण तयार होते. लहान मुलांमध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी रेकी खूप फायदेशीर ठरते.
रेकी शिकल्यानंतर दररोज सराव करणे आवश्यक आहे का?गरोदर स्त्रिया किंवा लहान मुले रेकी घेऊ शकतात का?
उत्तम परिणामांसाठी सुरुवातीला दररोज सराव करणे फायद्याचे ठरते. विशेषतः कोर्स पूर्ण झाल्यावर पहिले २१ दिवस स्वतःवर उपचार करणे महत्त्वाचे असते, जेणेकरून तुमच्या शरीरातील ऊर्जा मार्ग पूर्णपणे मोकळे होतात.