रेकी या जॅपनीज शब्दाचा अर्थ Life Force किंवा प्राण शक्ति आहे. ही एक प्राचीन ऊर्जा उपचार प्रक्रिया आहे जी अंतर्गत अडथळे दूर करण्यास आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता, आनंद आणि विपुलता वाढवण्यात मदत करते.
रेकी आपल्या शरीरातील जीवनशक्ती किंवा प्राणशक्तीला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात पुनर्निर्देशित करून कार्य करते. ही जीवनशक्ती आपल्या आतील सर्व नकारात्मक अडथळे आणि आघात दूर करण्यास मदत करते. नकारात्मक अडथळे कमी झाल्यावर आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागतात.
प्राथमिक स्तरावर रेकी स्पर्शाद्वारे कार्य करते. रेकी अभ्यासक त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करून प्राण शक्तीचा प्रवाह निर्देशित करतात आणि स्वतःला किंवा इतरांना बरे करतात. प्रगत स्तरावर रेकी अभ्यासक त्यांच्या हेतूच्या किंवा intention शक्तीचा वापर करून जगातील कोणत्याही व्यक्तीला दूरस्थ उपचार करू शकतात. ह्या शकतील देश काळ मर्यादा नसते.
नाही, रेकी केवळ शारीरिक उपचारांपुरती मर्यादित नाही. रेकीचा वापर स्वतःला किंवा इतरांना मानसिक आघातातून बरे करण्यासाठी, karmic cleansing साठी, psychic attack दूर करण्यासाठी, जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती साठी आणि बऱ्याच कारणासाठी केला जाऊ शकतो.
मुळतः रेकी सक्ती ही आंतरिक शुद्धी साठी वापरली जाते. ही शक्ति एखाद्या problem ला मूळापासून दूर करण्यासाठी वापरली जाते. जशी जशी आपली आंतरिक शुद्धी होते तसे तसे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होऊ लागतात.